breaking-newsमुंबई

रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात हजर! चौकशीला सुरुवात

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ईडीने सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिला नोटीस बजावली होती. त्यानुसार आज (७ ऑगस्ट) रिया चक्रवर्ती ही मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाली आहे. सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. याच प्रकरणी तिची चौकशी होणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये अशी विनंती रियाने केल्याचे तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले होते. मात्र रियाची ही विनंती फेटाळल्यानंतर आता तिची चौकशी सुरू झाली आहे.

काल गुरुवारी रिया चक्रवर्तीचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याची ईडीकडून जवळपास 9 तास कसून चौकशी झाली. मिरांडा दुपारी दीड वाजता ईडी कार्यालयात हजर झाला होता. तो रियाचे आर्थिक व्यवहार पाहायचा. तिची बँक खाती, पैसे काढणे, पैसे भरणे, आर्थिक व्यवहार अशी कामे तो करायचा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button