breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विराज दादा लांडे फाऊंडेशनने घेतलेल्या शिबिरात 189 जणांनी केले रक्तदान

पिंपरी / महाईन्यूज

कामगार दिनाचे औचित्य साधत विराज दादा लांडे युथ फौंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरात 189 जणांनी रक्तदान केले. शिबिरातील रक्त संकलनासाठी संजीवनी रक्त पेढी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आवारात आयोजित शिबिराचे उदघाटन भोसरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, उद्योजक सुधीर मुंगसे, निष्णांत ढोले, संकल्प अण्णा, अभिजित लांडे, अमोल पुंडे, प्रवीण सिंग आदी उपस्थित होते.

यावेळी १८९ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान करणा-या प्रत्येक रक्तदात्याला यावेळी कोरोना प्रतिबंधक सुरक्षा किट, प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विराज लांडे, वृषभ लांडगे , संतोष सावंत, अभिषेक लांडे, पृथ्वी काकडे तसेच विराज दादा लांडे युथ फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button