breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 1,717, पुण्यात 7,714 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 51,79,929 वर

मुंबई – राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात 40,956 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 793 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 71,966 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 51,79,929 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 77,191 इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत 45,41,391 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 5,58,996 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मागील महिन्यात सलग पाच हजारांहून अधिक विक्रमी दैनंदिन रुग्णवाढ होत होती. मात्र २६ एप्रिलपासून दररोज ५ हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद होत असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. काल दिवसभरात मुंबईत 1,717 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 51 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 6,082 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 6,79,986 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 13,942 इतका झाला आहे, तर आतापर्यंत 6,23,080 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 41,102 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात मंगळवारी 7,714 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 9,33,516 वर पोहोचली असून काल दिवसभरात 142 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा 14,642 इतका झाला आहे. तसेच पुण्यात काल 3,486 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. दरम्यान, काल आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 2,404, तर पिंपरी-चिंचवडमधील 1,547 रुग्णांचा समावेश आहे.

Sharing is caring!

Facebook
Pinterest
Twitter
Google+
Related Posts:
अभिनेत्री दिव्या भटनागरचे कोरोनाने निधन
अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोनामुक्त
ब्राझीलमध्ये चिनी लसीविरोधात जोरदार आंदोलन
अमेरिकेत १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस; जो बायडेन यांची घोषणा
Tags: Corona,Corona Pandemic,corona virus,covid,COVID19,maharashtra,mumbai,pune,Uddhav Thackeray,vaccine

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button