breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना रूग्णांसाठी वेबसाईट बनवणाऱ्या दहावीच्या मुलाला महापौरांनी दिली शाबासकीची थाप

पुणे – पुण्यात गेल्या काही दिवसांपासूून कोरोनाने थैमान घातलं होतं. पण आता पुण्यात कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारत असल्याचं दिसत आहे. कोरोना काळात आयआयटी इंजिनियर्सने अनेक शोध लावत कोरोना रोखण्यासाठी विविध उपकरणे तयार केली होती. त्याचं सर्वत्र कौतूक देखील झालं होतं. आता पुण्यातल्या एका 15 वर्षाच्या मुलाने कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी एक वेगळा प्रयोग केला आहे.

पुण्यातील दस्तूर शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विराज राहुल शहा या 15 वर्षीय विद्यार्थ्यांने कोरोनाबाबत इत्यंभूत माहिती देणारी वेबसाईट तयार केली आहे. यासाठी विराज शहाने रितसर प्रशिक्षण घेऊन कोरोनाविषयीची सर्व माहिती जमा करुन ती एका वेबसाईटच्या रुपानं समोर आणली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विराज शहाच्या वेबसाईटचं उद्घाटनही पार पडलं.’जीवन रक्षा डाॅट काॅम’ असं या वेबसाईटचं नाव आहे. त्यामध्ये कोरोनापासून कोणती काळजी घ्यायची याची पुर्ण माहिती दिली आहे, त्याचबरोबर, लसीकरणापासून ते ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थांपर्यंत कुठे काय उपलब्ध आहे? या संदर्भात सर्व माहिती यात उपलब्ध आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विराज शहाला शाबासकीची थाप दिली आहे.

दरम्यान, प्लाझ्मा दानविषयी माहिती देणाऱ्या लाईफ डोनेशन पोर्टलचीही निर्मिती विराज शहाने यात केली आहे. या वेब पोर्टलच्या साहाय्याने लोकांना रक्तदान, प्लाझ्मा दानविषयी सामान्य लोकांना माहिती मिळत आहे. लोकांना गरज असताना विराज शहानं केलेल्या कामाचं कौतूक करायला हवं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button