breaking-newsपुणे

1,300 किलोमीटरची भिस्त 700 जणांवर

 

  • मनुष्यबळाविना लोहमार्ग पोलीस “पंगू’ : नवीन भरतीची गरज
    सेवानिवृत्तांची संख्या वाढल्याने प्रशासकीय संकट

पुणे- लोहमार्गाची राज्यातील सर्वात मोठी हद्द असलेल्या पुणे लोहमार्ग पोलिसांना सध्या मनुष्यबळाचे “ग्रहण’ लागले आहे. तब्बल 1,300 किलोमीटरची हद्द असलेल्या या पोलीस दलाकडे अवघे 700 ते 800 अधिकारी आणि जवानांचे मनुष्यबळ आहे, त्यातच सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने या संकटामध्ये भरच पडत आहे. त्यामुळे बंदोबस्त ठेवताना आणि प्रवाशांना सुरक्षा पुरविताना लोहमार्ग पोलिसांना करावी लागत आहे.

पुणे लोहमार्ग पोलीस विभागाच्या हद्दीत पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यांतर्गत 6 पोलीस ठाणे, 13 आऊटपोस्ट, 3 दूरक्षेत्र, 4 मदत केंद्रे, 168 रेल्वे स्थानके आणि 235 रेल्वे प्लॅटफॉर्मांचा समावेश आहे. या स्थानकांची लांबी किमान 1,300 किलोमीटरची आहे. हद्द मोठी असतानाही लोहमार्ग पोलिसांकडे सध्या केवळ 700 ते 800 अधिकारी आणि जवानांचे मनुष्यबळ आहे. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावे, असा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविला असून याला मंजुरी मिळेल, असा विश्‍वास लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.

पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत प्रवाशांना गुंगीचे औषध त्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्याशिवाय सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन प्रवाशांना लुटण्यात येत होते. मनुष्यबळामुळे या घटना रोखण्यासाठी काही प्रमाणात मर्यादा येत होत्या. पण, या घटनांचे प्रमाण कमी झाल्याचे सांगत डॉ. बुधवंत म्हणाले, आगामी काळात हे मनुष्यबळ मिळावे, यासाठी मुख्य कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून त्यामध्ये निश्‍चितच यश येईल.

  • उपलब्ध मनुष्यबळातच नियोजन करण्यात येत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. नुचित घटना घडण्याची जी ठिकाणे आहेततेथे नाकाबंदी करण्यात येत आहे. आगामी काळात आणखी कुमक मिळाल्यानंतर या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात येणार आहे.डॉ. प्रभाकर बुधवंत, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस, पुणे विभाग
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button