breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अंध, अपंग, मुकबधिर विद्यार्थी-नागरिकांना मिळणार मोफत पास

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलाच्या संरक्षण विभागाच्या ताब्यातील जागेकरिता पर्यायी जागेचे मुल्य 25 कोटी 81 लाख 51 हजार रुपये अदा करण्यास आज (बुधवारी) स्थायीने मान्यता दिली. तसेच अंध, अपंग, मुकबधिर विद्यार्थी, नागरिकांना पीएमपीएमएलचे मोफत बस पास पोटी एकूण 4 कोटी 58 लाख 29 हजार रुपये देण्यास मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाकडून विद्युत पोल साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्या सुमारे ५१ लाख १९ हजार रूपये खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ४ बोपखेल गावातील स्मशान भूमीजवळ रस्ता विकसित करण्यास येणा-या सुमारे २ कोटी २८ लाख ८७ हजार रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या वाहन दुरूस्ती कार्यशाळा विभागाकडून ई या गटातील वाहनांवरील हैड्रोलिक यंत्रणा दुरूस्ती करण्यात येणार आहे. तीन वर्षे कालावधीसाठी कामे करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ६६ लाख ५३ हजार रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. पालिकेच्या रूग्णालयास दोन वर्षाचे कालावधीत आवश्यक असलेले औषधे/ साहित्य खरेदीकामी येणा-या ३ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या रूग्णालयास दोन वर्षाचे कालावधीत आवश्यक असलेले औषधे/ साहित्य खरेदीकामी येणा-या ९९ लाख ९७ हजार रूपयांच्या खर्चास देण्यात आली. वाय सी एम रूग्णालयासाठी दर करार पद्धतीने महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ, मुंबई (महाटेक्स) यांचेकडून लिनन साहित्य (बेडशिट व वुलन ब्लँकेट ) दर करारानुसार थेट पद्धतीने खरेदी करणेस व त्याकामी येणा-या ५१ लाख २६ हजार रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

नाशिकफाटा ते वाकड बी.आर.टी.एस. रस्त्यावरील शेडगेवस्ती ते वाकड चौक येथील रस्त्याचे उर्वरित कामे करणेकामी येणा-या ५ कोटी ५१ लाख ३६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांकरीता इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणेचे कामकाजासाठी येणा-या ६७ लाख ४४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.६ मधील सद्गुरुगर, महादेवनगर व उर्वरित परिसरात आवश्यकतेनुसार ड्रेनेजलाईन बदलणेकामी येणा-या ३८ लाख २५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.६ मधील धावडेवस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत सदगुरूनगर, लांडगेवस्ती, महादेवनगर व उर्वरित भागातील जुन्या मलनि:सारण नलिकांमध्ये सुधारणा करणेकामी येणा-या ३८ लाख २६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या सर्व अग्निशामक केंद्रामध्ये अद्यावत सी.सी.टी.व्ही यंत्रणा उभारणेकामी येणा-या ९७ लाख ९२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थापत्य विभागाकडील नि.नो.क्र. २४/५/२०१९-२० अन्वये क्र. १३ मधील मुक्ताई उद्यान, नाना-नानी उद्यान व इतर उद्यानात पाथवे रबर मोल्डेड ब्लॉक बसविणे व इतर उद्यानांची स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या ५८ लाख ९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जलनि:सारण विभागाकडील आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. १५ मधील आकुर्डी गावठाण, गंगानगर, परिसर व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणा-या ३३ लाख ५४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलासाठी संरक्षण विभागाच्या ताब्यातील जागेच्या पर्यायी जागेकरता राज्यशासनास सदर जागेचे मुल्य २५ कोटी ८१ लाख ५१ हजार रूपये अदा करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ५ मधील गवळीनगर, आदर्शनगर परिसरातील मलवाहीनी सुधारणाकामे करणेकामी ३५ लाख ९३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. से.क्र.२३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विविध इमारतींच्या छतांना गळतीरोधक उपाययोजना (water proofing) करणे व इतर तदनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या २६ लाख १४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र१९ मधील भाटनगर व इतर परिसरातील पेव्हींग ब्लॉक, स्टॉर्म वाटर लाईनची दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या २७ लाख ५३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २० संत तुकारामनगर मधील वाय.सी.एम रूग्णालयामधील संडास ब्लॉक व डक्ट विषयक विविध दुरूस्ती व इतर नुतनीकरणाचे कामे करणेकामी येणाऱ्या २५ लाख ५१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. १२ तळवडे गावठण परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या ४२ लाख ६६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रभाग क्र.२१ पिंपरी मध्ये ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती व इतर आकस्मितपणे उद्भवणारी जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २७ लाख २३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.२० परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ४४ लाख ६० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २० संत तुकाराम नगर, गंगानगर, महात्मा फुलेनगर, कासारवाडी गावठाण परिसर व उर्वरित भागामध्ये वार्षिक ठेकेदारी पद्धतीने ड्रेनेज लाईनची व चेंबरची देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या ३९ लाख ८३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली
कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.५ संत तुकाराम नगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर व गंगोत्री पार्क परिसरामध्ये मलवाहीनी सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या ३४ लाख ८२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. २० कासारवाडी मनपा शाळा येथे फर्निचर विषयक कामे करणेकामी २७ लाख ८८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्र.क्र. १६ मधील किवळे परिसरामध्ये वार्षिक ठेकेदारी पद्धतीने ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करणेकामी ३८ लाख ४६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. १३ येथील से.क्र. २२ परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा विषयक कामे करणेकामी ५६ लाख ७६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१७ मधील दळवीनगर, पांढारकर चाळ, इंदीरानगर व इतर परिसरातील जलनि:‍सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकणेकामी ५४ लाख ८४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.२७ रहाटणी मधील विविध परिसरात नव्याने ताब्यात आलेल्या रस्त्यामध्ये जलनि:सारण नलिका टाकणेकामी ६१ लाख २७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.८ मधील सेक्टर नं. ७ ते बालाजीनगर नाल्यापर्यत मुख्य जलनि:सारण नलिकेमध्ये सुधारणा करणेकामी ४६ लाख २७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. से.क्र. २३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे यांत्रिक व तांत्रिक विषयक देखभाल करणेकामी ९५ लाख ५९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

से.क्र. २३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे असलेल्या विविध केमिकल टाक्यांना आवश्यक सुरक्षा आवरण करून Agitator सिस्टीम पुरविणे, बसविणे व कार्यन्वित करणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी ४८ लाख २९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. जलशुद्धीकरण केंद्र से.क्र. २३ येथील टप्पा क्र.२ च्या फिल्टर बेडची वाळू बदलणे, सुरक्षा आवरण करणे व तदनुषंगिक कामे करणेकामी १ कोटी ६१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयातर्गत प्रभाग क्र.२७ रहाटणी मध्ये ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती व इतर आकस्मितपणे उद्भवणारी जलनि:सारण विषयक कामे करणेकामी २६ लाख ८६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

से.क्र. २३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातील स्थापत्य विषयक कामे करणे व इतर देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी ३३ लाख ८७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयाअतर्गत प्र.क्र. १६ मधील रावेत परिसरामध्ये वार्षिक ठेकेदारी पद्धतीने ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करणेकामी ३८ लाख ७१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १६ येथील रावेत, किवळे व मामुर्डी परिसरातातील नदीच्या कडेने जुन्या मुख्य गुरूत्व नलिका बदलणे/ स्थलांतरित करून नव्याने आवश्यक व्यासाच्या मुख्य गुरूत्व नलिका टाकणेकामी ६७ लाख २२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. १२, रूपीनगर व सहयोगनगर परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा विषयक कामे करणेकामी येणाऱ्या ६३ लाख ०३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १२, त्रिवेणीनगर व ताम्हाणेवस्ती परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा विषयक कामे करणेकामी ६२ लाख ४७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १६ येथील रावेत परिसरातील नव्याने विकसित होणाऱ्या परिसरात जलनि:सारण नलिका नव्याने टाकणे विषयक कामे करणेकामी ६१ लाख ६३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १२ तळवडे, रुपीनगर व परिसरातील चेंबर्स व ड्रेनेज लाईनची आवश्यकतेनुसार देखभाल दुरूस्ती करणेकामी ३१ लाख ७९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

बोऱ्हाडेवाडी बनकरवस्ती ते मोशी (देहू फाट्यापर्यत) पुणे नाशिक महामार्गालगत नविन ड्रेनेज लाईन टाकणेकामी ३५ लाख ४४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button