breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

इरशाळवाडीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ११ लाख रुपयांची मदत

मुंबई : मागील आठवड्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडुन देण्यात येणारी मदत तसेच जखमींच्या उपचारावर होणारा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केले.

यानुषंगाने दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ११ लाख रूपयांचा धनादेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुपूर्द केला.

हेही वाचा – अजित पवार मुख्यमंत्री होणार का? पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट तारीखच सांगितली

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वैयक्तिकरित्या एक लाख आणि लोकसहभागातून दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. संवेदना सोशल फाऊंडेशन-कोल्हापूर, सावली सेवा फाऊंडेशन-पुणे, पुनर्निमाण सोशल फाऊंडेशन-पुणे, युवा स्वराज्य प्रतिष्ठान-पुणे या संस्थांकडून प्रत्येकी रुपये दोन लाख आणि आई प्रतिष्ठान-सोलापूर व चैतन्य प्रतिष्ठान-मुंबई या संस्थांकडून प्रत्येकी एक लाख असे एकूण रुपये ११ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button