breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल राज्य सरकारकडे मराठवाडा जनविकास संघाकडून ११ मागण्या सादर

पुणे : मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षा निमित्त ११ मागण्याचे प्रस्ताव देण्यात आला.

ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतुन संपुर्ण देश स्वतंत्र झाला मात्र हैदराबादच्या निजामाची धर्मांध सत्ता आणि रझाकारच्या जुलमी राजवटीखाली मराठवाड्यातील जनता अतोनात छळ सोसत होती. मराठवाड्यातील जन आंदोलनाच्या कणखर रेटयापुढं अखेर निजाम शरण आला अन् देशाच्या स्वातंत्र्यानंतर वर्षाभरानं १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

गौरवशाली महाराष्ट्राच्या मातीसाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी मराठवाड्याचा हैदराबाद मुक्तीसंग्रामातील ज्वाजल्य इतिहास नवीन पिढीस कळण्यासाठी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी जुलमी निजामशाही उलथुन टाकत मराठवाड्यात स्वातंत्र्याची नवी पहाट आणण्यासाठी ज्या शुरवीर स्वातंत्र्यसैनिकांनी स्वता: च्या प्राणाचे बलिदान दिले, धैर्याने आपल्या मराठवाड्याच्या मातृभुमिसाठी लढले त्यांच्या स्मरणात देशभक्तीच स्फुल्लींग मनामनात पेटवणारी तेजस्वी मराठवाड्याची अस्मिता राष्ट्रीय स्तरावर जागृत करणारी विशाल, उत्तम, सशक्त, शौर्य, बलिदान, संस्कृती, ऐतिहासिक अभ्यास पुर्ण माहीती संपुर्ण देशाला कळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे खालील प्रमाणे रितसर ११ मागण्या पत्रातुन मांडले आहेत.

हेही वाचा – धक्कादायक : वायसीएम हॉस्पिटलमधील कचराकुंडीत नवजात अर्भक सापडले!

१ . महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनात १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त शासकीय झेंडा वंदनाचा कार्यक्रम अमृत महोत्सव वर्षा पासुन दर वर्षासाठी सुरु करण्यात यावा.

२. महाराष्ट्र शासन मंत्रालय ,मुंबई येथे मुख्यसचिवांच्या उपस्थितीत हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा यांना मानवंदना १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृति स्तंभाच्या प्रतिमेस पुस्पहार अर्पण करुन दरवर्षी मानवंदना देण्यात यावी.

३. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या शुभहस्ते १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त राजभवनात शासकीय पातळीवर झेंडा वंदनाचा कार्यक्रम दर वर्षासाठी सुरु करण्यात यावा.

४. महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा व विधान परिषदां मध्ये दोन दिवस हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारीत विशेष अधिवेशनाची शासकीय तरतुद करावी.दोन्ही सभागृहात मराठवाडा मुक्तीसंग्रामावर अभ्यास पुर्ण चर्चा करण्यात यावी, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा ज्वाजल्य इतिहास नवीन पिढी पुढे आणावा.

५. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार ” भारतरत्न ” मरणोत्तर देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा व विधानपरिषद मध्ये ठराव मंजुर करून भारत सरकार यांना पाठवावा.

६. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुर्णाकृती पुतळा महाराष्ट्र सदन ,नवी दिल्ली येथे सन्मानपुर्वक बसविण्यात यावा.

७. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कलम ३७१ ( अ ) अंतर्गत केंद्र सरकारचा शासकीय नियमावलीत तरतुद अर्थ संकल्यात करून शासकीय आर्थिक पुरवठा करावा व मराठवाड्याचे मागासले पणाचा ठपका विकासाच्या विविध योजनांचा समावेश करुन कमी करावा.

८. हैदराबाद मुक्ती लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अनेकांनी आपले घर संसारावर तुळशीपत्र ठेवले तसेच अनेक हुतात्मे मुक्तीसंग्राम लढुन ही आजतागायत अंधारातच राहीले, दुर्देवाने त्यांचा इतिहास ही लिहीला गेला नाही ,त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीन हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाचे सत्य पुर्नलेखन होणे आवश्यक आहे, यावर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा.

९. महाराष्ट्र शासनाच्या माहीती व जनसंपर्क विभागाच्या वतीन प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकातुन हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्ष विशेषांक प्रकाशित करण्यात यावा.

१०. महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनात मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा.

११. जगप्रसिध्द वेरुळ अजिंठा लेण्याच्या कुशीत भोसले कुळाच्या मुळगावात मराठवाड्याचा ऐतिहासिक, धार्मिक, सामाजीक,संत, प्रबोधनात्मक ,मुक्तीसंग्राम लढा, कृषी, संस्कृती माहीतीच आंतरराष्ट्रीय दर्जाच मराठवाडा सृष्टी संग्रहालय पवित्र ऐतिहासिक वेरुळ नगरीत उभ कराव.

१२. हैदराबाद मूक्ती लढ्यातील पात्र व खऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची गेल्या अनेक वर्षा पासुन शेकडो पेंशन प्रकरणे मंत्रालयात पडुन आहेत त्या मध्ये शासन स्तरावर लक्ष घालुन योग्य ते निर्णय घेण्यात यावा.

स्वामी रामानंद तीर्थ जन्मभुमि सिंदगी ते समाधीस्थळ हैदराबाद पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा संकल्पक नितीन चिलवंत व मराठवाडा जनविकास संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वृक्षमीत्र अरुण पवार या दोघांच्या संकल्पनेतुन शासन स्तरावर ११ मागण्या ठेवण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button