TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७३ वा जन्मोत्सव उत्साहात

पुणे : भगवान साई झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन… भक्तीभावाने केलेली आरती… रॉकस्टार निल तलरेजाचा लाईव्ह कॉन्सर्ट… सिंधी गायिका निशा चेलानीचे बहारदार सादरीकरण… स्टॅन्ड अप कॉमेडियन मोहित शेवानीचे ओघवते निवेदन… सिंधी गीतांच्या ऐकाव्याश्या वाटणाऱ्या चाली… कलात्मक नृत्याविष्कार… चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि झुलेलाल यांचे अखंड भजन यातून नववर्षाच्या सुरुवातीला सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले. या वार्षिक महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

निमित्त होते, सिंधी समाजाच्या नववर्षाचे! भगवान साई झुलेलाल यांच्या १०७३ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सवाचे अल्पबचत भवनमध्ये आयोजन केले होते. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. मुंबईतील रॉकस्टार गायक नील तलरेजाचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि इंदोर येथील लोकप्रिय सिंधी गायक निशा चेलानीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानीने कार्यक्रमाचे संचालन केले. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीच्या मुलांनी मनमोहक नृत्याविष्कार सादर केले. प्रीतिभोजनाने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता झाली.

यावेळी या कार्यक्रमात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन वालेचा, बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सह-अधिष्ठाता डॉ. भारती दासवानी, उत्तम केटरर्सचे लकी सिंग यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी, संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, माजी अध्यक्ष मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, पीटर दलवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पर्यानी, सचिव सचिन तलरेजा,  खजिनदार राजेंद्र फेरवानी, सहखजिनदार निलेश फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला आदी उपस्थित होते. या महोत्सवात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळपास तीन ते चार हजार सिंधी बांधव सहभागी झाले होते. दीदी कृष्णकुमारी यांनी महोत्सवात उपस्थित राहून सिंधी बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या.

अशोक वासवानी म्हणाले, “सिंधी संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सिंधू सेवा दल गेली ३६ वर्ष कार्यरत आहे. चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो.” सुरेश जेठवानी प्रास्ताविक केले. सचिन तलरेजा यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button