breaking-newsTOP Newsआरोग्यमुंबई

थकवा, अंगदुखी, जुलाब, थंडी वाजणे; कोरोनाची नवी लक्षणे सामोर

मुंबई – कोरोनाची दुसरी लाट भारतीयांसाठी भयंकार ठरत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 17 हजाराहून अधिक रुग्ण सापडले. मृतांचा आकडाही मोठा आहे. त्यातच कोरोनाची नवी लक्षणे समोर येत आहेत. कोरोनाचा हा नवा प्रकार अवघ्या मिनिटभरात समोरच्या व्यक्तीला बाधित करतोय.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवे प्रकार समोर येत आहेत. पहिल्या प्रकारापेक्षा नवा येणार प्रकार अधिक घातक असल्याचं स्पष्ट झालं आहे.  तज्ज्ञांच्या माहितीवरुन छापलेल्या रिपोर्टमध्ये, कोरोनाची नवी लक्षणे दिसत असल्याचं म्हटलं आहे.

कोरोनाची नवी लक्षणे

कोरोनाच्या आधीच्या संसर्गापेक्षा आताची लक्षणे गंभीर आहेत. यापूर्वी असिम्पटोमॅटिक म्हणजेच लक्षणविरहीत कोरोना रुग्ण आढळत होते. कोरोनाच्या लक्षणामध्ये घशात खवखव आणि घशात टोचल्यासारखं जाणवत आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांपैकी 52 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळत आहेत. खाताना किंवा पाणी पितानाही काही रुग्णांना घशात जळजळ जाणवते.

थकवा

COVID-19 संसर्गामध्ये अनेक रुग्णांना खूप थकवा जाणवत आहे. खरं पाहता कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये रुग्णांना थकवा जाणवतो. मात्र कोरोना रुग्णांमध्ये त्याचं प्रमाण अधिक आहे.

स्नायू, सांधे दुखणे

कोरोना रुग्णांमध्ये थकवा जाणवणं हे सामान्य लक्षण आहे. मात्र आता रुग्णांना स्नायूदुखीचाही त्रास होत आहे. स्नायूदुखी, सांधेदुखी, संपूर्ण अंग दुखणे अशी लक्षणे जाणवत आहेत. कोरोना संसर्गकाळात संपूर्ण अंग दुखणे, शरिराला सूज जाणवणे, सांधे दुख, प्रचंड थकवा अशी लक्षणे दिसत आहेत.

थंडी वाजणे

कोरोना रुग्णांना अचानक थंडी वाजणे, अंग कापणे अशी लक्षणेही दिसू लागली आहेत. सुरुवातीच्या काळात थोडी थंडी वाजून, हलका ताप जाणवतो. इतकंच नाही तर मळमळ आणि उल्टी ही सुद्धा सुरुवातीची लक्षणे आहेत.

जुलाब होणे

जुलाब होणे हे सुद्धा लक्षण जाणवत आहे. याशिवाय चक्कर येणं आणि काही प्रकरणात ऐकायलाच कमी येणं, स्नायू दुखी (Muscle Pain), त्वचा संसर्ग( स्किन इन्फेक्शन) किंवा नजर कमी होणे ही सुद्धा कोरोनाच्या नव्या अवताराची लक्षणे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button