TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणे

दिव्यांग व्यक्तीशी लग्न केल्यास 1 लाखाचे अर्थसहाय्य; 5 वर्षांत या योजनेचा शहरातील 63 जोडप्यांनी घेतला लाभ

पिंपरी-चिंचवड | दिव्यांग व्यक्तीशी  विवाह केल्यास त्यांच्या संसारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 1 लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. गेल्या 5 वर्षांत या योजनेचा शहरातील 63 जोडप्यांनी लाभ घेतला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. याचबरोबर शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग कक्षामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा शहरातील दिव्यांग बांधवांना मोठा आधार होत असून जीवन सुकर होण्यासाठी लाभ होत आहे.

दिव्यांग व्यक्तींना समाजात वावरता अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे 40 टक्‍यांपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाण असल्यास अशा दिव्यांगाशी अव्यंग व्यक्तीने विवाह केल्यास त्यांना पालिकेतर्फे प्रोत्साहन म्हणून एक लाख रूपये देण्यात येतात.

2018 ला ही योजना सुरू करण्यात आली असली तरी पहिल्या वर्षी एकाही जोडप्याने या योजनेचा लाभ घेतला नाही. त्यानंतर 2019-20 मध्ये 20, 2020-21 मध्ये 20, 2021-22 मध्ये 19 तर 20202-23 मध्ये जुलैअखेर 4 अशा 63 जणांना 63 लाख रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी दरवर्षी 20 लाखांची तरतूद करण्यात येते.

“दिव्यांग व्यक्तींना दररोजच्या आयुष्यात जगताना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांग व्यक्तींप्रती समाजाचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने दिव्यांग व्यक्तीशी अव्यंग व्यक्तीने विवाह केल्यास त्यांच्या संसाराला हातभार म्हणून पालिका 1 लाखांची मदत करते. यामधून त्या जोडप्याला जगण्याची नवी उमेद मिळावी, हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे”, असे समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button