breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आमदार लक्ष्मण जगतापावर सात कोटी कर्ज, एकही चारचाकी नाही

लक्ष्मण जगताप यांची एकूण संपत्ती १६ कोटी ४२ लाखाची स्थावर व जंगम मालमत्ता

जगतापांनी चार जणांना दिले दीड कोटीचे कर्ज, उमेदवारीच्या विवरणपत्रात दिली माहिती

पिंपरी |महाईन्यूज|

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार असलेले लक्ष्मण जगताप यांनी सात जणांकडून सात कोटीचे कर्ज घेतले आहे. त्याच्याकडे एकही चारचाकी वाहन नाही. तसेच त्यांनी चार जणांना सुमारे दीड कोटीचे कर्ज घेतले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी 16 कोटी 42 लाख रुपयांची संपत्तीची माहिती विवरणपत्रात दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी १६ कोटी ४२ लाख रुपयांच्या संपत्तीची माहिती विवरणपत्रात दिली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये लक्ष्मण जगताप यांनी मालमत्तेचा तपशील दिला आहे. लक्ष्मण जगताप यांच्याकडे विविध ठिकाणी शेत जमीन आणि बिगरशेती जमीन आहे. त्यांच्याकडे ७८ हजार रुपये किंमतीचे रिव्हॉल्वर असून ५० हजार रुपये किंमतीचे घड्याळ आहे. तर त्यांच्याकडे एकही मोटार नाही. जगताप यांनी शेती आणि व्यवसाय हे आपले उत्पन्नाचे स्त्रोत असल्याचे म्हटले आहे.

लक्ष्मण जगताप यांच्याकडे एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, दि कॉसमॉस को-ऑप बँक, सेवा विकास बँकेत ५५ लाख ३८ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. तर संततुकाराम सहकारी साखर कारखाना, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय प्रोडेन्शिअल बँकींग फायनान्स, सेवा विकास बँक अशा १९ ठिकाणी ११ लाख ८४ हजार ४३६ रुपयांचे शेअर्स आहेत. तसेच एलआयसीमध्ये ३३ लाख ७१ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे.

जगताप यांची खेड तालुक्यातील मरकळ येथे दोन ठिकाणी तर चाकण येथे दोन ठिकाणी शेत जमीन आहे. त्याची किंमत ६० लाख रुपये आहे. तर पिंपळे गुरव येथे पाच ठिकाणी बिगरशेती जमीन आहे. याची बाजारभावाप्रमाणे २ कोटी २५ लाख रुपये किंमत आहे. जगताप यांनी चार जणांना १ कोटी ५० लाख २४ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. त्यांच्याकडे ७ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे २२० ग्रॅम सोने आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button