breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

1 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारकडून एलपीजी कनेक्शन,जुनी मिठाई, क्रेडिट कार्ड अशा अनेक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल

आज म्हणजेच 1ऑक्टोबरपासून केंद्र सरकारकडून नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. ज्याचा थेट परीणाम जनसामान्यांवर होणार आहे. जसे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या मध्यमातून देण्यात येणारी मोफत एलपीजी गॅस कनेक्शन ही सेवा आजपासून बंद झाली आहे. मिठाई दुकानदारांना वैधता संपलेली मिठाई विकता येणार नाही. वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे Driving License आणि केडिट कार्ड आदींबातही काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

कोणते बदल आजपासून करण्यात आलेले आहेत ते पाहुयात

फ्री एलपीजी कनेक्शन शेवटचा दिवस
प्रधानमंत्री उज्जवला योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी काल 30 सप्टेंबर शेवटचा दिवस होता. या योजनेंतर्गत मिळणारे फ्री एलपीजी गॅस कनेक्शन आजपासू बंद झाले आहे.

वाहन चालवताना मोबाईल वापरास सवलत
केंद्र सरकारने वाहतूक नियमामत महत्त्वपूर्ण बदल करत वाहन चालवताना नियम व अटींचे पालन करुन मोबाईल वापरास परवानगी दिली आहे. नव्या नियमानुसार वाहन चालवतान नेविगेशन म्हणजेच रस्ता पाहण्यासाठी (दिशा, मार्ग) मोबाईलचा वापर करता येणार आहे. मात्र, मोबाईल वापरताना चालकाला वाहनावरील ताबा सुटणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे लागमार आहे. दरम्यान, वाहन चालवताना फोनवर बोलण्यास मात्र मनाई कायम ठेवण्यात आली आहे. वाहन चालवताना चालक जर मोबाईलवर बोलताना आढळला तर 1 ते 5 हजार रुपयांचा दंड आकारण्याचे प्रावधान या नियमांमध्ये आहे.

जुनी मिठाई विकण्यास बंदी
मिठाई विक्रेत्यांना यापुढे मुदत संपलेली म्हणजेच एक्सपायरी डेट संपलेली मिठाई विक्री करता येणार नाही. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार एक्सापायरी डेट संपलेली मिठाई विकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा नियम एक ऑक्टोबरपासून लागू असणार आहे. एफएसएसएआईने संबंधित नियमांचे पालण करण्यााबत देशभरातील सर्व राज्यांना एक पत्रही लिहिले आहे.

क्रेडिट कार्डबाबत नवे नियम
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्य यांबाबत आजपासून लागू झालेल्या नव्या नियमानूसर यापूडे क्रेडिट कार्डचा वापर केवळ PoS पेमेंट करताना किंवा एटीएममधून पैसे काढतानाच करता येणार आहे. हा नवा बदल सर्व कार्ड्स, नवे कार्ड्स किंवा रिन्यू केलेल्या कार्ड्सनाही लागू असणार आहे. ऑनलाईन, कॉन्टेक्टलेस किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहारांसठी जर कार्ड्सचा वापर करत असाल तर त्यासाठी या सेवा आपल्याला मॅन्यूअली सुरु कराव्या लागतील. या सेवा वापरण्यासाठी आपण नेटबँकींग सुरु करु शकता. त्याशिवाय ATM किंवा ब्रँचमध्ये जाऊनही या सेवा सुरु करता येऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button