breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारत बंदमध्ये सहभागी व्हा’

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला राज्यातही संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटनांनी आजच्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहेत. या बंदमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस पक्षाने केले आहे.

“भारत बंद हा शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा भारत बंद आहे. मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी भाजपा सरकार शेतकरीविरोधी, कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. भाजपाच्या पाठीशी आता रामही उभा राहणार नाही”, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच, “७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा!”, असं ट्विट करत जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही थोरात यांनी केलं आहे. याशिवाय, शेतकरी आंदोलन व भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील रिगल सिनेमाजवळील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी ट्विटरद्वारे दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button