breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

५९ चिनी अ‍ॅपवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे देशातल्या डिजिटल बाजारात माेठी पाेकळी निर्माण

अचानक ५९ चिनी अ‍ॅपवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे देशातल्या डिजिटल बाजारात माेठी पाेकळी निर्माण झाली आहे. ही पाेकळी रिलायन्स जिओ आणि अमेरिकेतल्या कंपन्यांसाठी भारतीय डिजिटल बाजारपेठेत आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. जिओ आणि इन्स्टाग्रामने तर त्याची सुरुवातही केली आहे. या दाेन कंपन्यांनी फेसबुकचीही भागीदारी आहे. याशिवाय गुगलही या बाजारावर नजर ठेवून आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगात भारतामध्ये डेटा सगळ्यात स्वस्त असल्याने गावांपासून ते शहरापर्यंत टिकटाॅक, व्हिगाे लाइव्ह, लाइकसारख्या चीन अ‍ॅपचा विस्तार झाला हाेता. एकट्या टिकटाॅकला जवळपास १,५०० काेटी रुपयांचा नफा हाेत हाेता. आता या कंपन्या बाजारातून बाहेर फेकल्यानंतर लाेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशी स्टार्टअप कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. व्हिडिओ सेवा देणाऱ्या ग्लास स्टार्टअपने १० काेटी युजर्सचे उद्दिष्ट ठेवले. राेपाेसाेसारखे स्टार्टअप टिकटाॅकसाठी पर्याय बनण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु खरी स्पर्धा सुपर अ‍ॅपसाठी आहे. असा अ‍ॅप, जाे १६ भारतीय भाषांबराेबरच इंग्रजीत पेमेंट, व्हिडिओ व ई-काॅमर्ससह विविध सुविधा देणारे सुपर अ‍ॅप म्हणून ओळखले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button