breaking-newsराष्ट्रिय

आयटीबीपीच्या गिर्यारोहकांनी सर केले लिओ परगिल शिखर

शिमला – हिमाचल प्रदेशमधील आयटीबीपीच्या गिर्यारोहकांनी 22 हजार 222 फूट उंचीवर असलेल्या लिओ परगिल पर्वतावर यशस्वीरीत्या चढाई करत भारताचा तिरंगा तिथे फडकवला आहे. आयटीबीपी शिमला सेक्टर हेड क्वार्टर्समधील 16 सदस्यांच्या टीमपैकी एकूण 12 जणांनी यशस्वीरित्या हे शिखर सर केले.

लिओ परगिल पीक हे भारतातील सर्वात कठिण शिखर मानले जाते. हिमाच्छादित हे शिखर हिमाचल प्रदेशच्या दुर्गम लाहौल स्पीती जिल्ह्यात आहे. या कठिण समजल्या जाणाऱ्या मोहिमेचे नेतृत्त्व डेप्युटी कमांडंट कुलदीप सिंग आणि डेप्युटी लिडर कमांडंट धर्मेंद्र यांनी केले. किन्नौरमधील शेवटचे सीमावर्ती गाव चितकुल येथील रहिवासी हेड कॉन्स्टेबल प्रदीप नेगी यांनी दुसऱ्यांदा हा शिखर सर केला आहे. यापूर्वी नेगी यांनी जगातील सर्वात उंच असलेला एव्हरेस्ट पर्वत दोनदा सर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button