breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

२४ तासांत ६१,२६७ नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ६६,८५,०८३ वर

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत आहे. देशात दररोज 70 ते 80 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होते. मात्र त्यातच आज काहीशी दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 61 हजार 267 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 884 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 85 हजार 083 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 03 हजार 569 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 56 लाख 62 हजार 491 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 9 लाख 19 हजार 023 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button