breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

२३ सप्टेंबरला भारतात Moto E7 Plus स्मार्टफोन येतोय

नवी दिल्ली – Moto E7 Plus स्मार्टफोन २३ सप्टेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. मोटोरोलाने शुक्रवारी याची माहिती दिली. फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या या फोनसाटी ई-कॉमर्स वेबसाईटवर वेगळी मायक्रो साइट बनवली आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, या फोनची विक्री फ्लिपकार्टवर होणार आहे. Moto E7 Plus स्मार्टफोन ब्राझील मध्ये आणि युरोपमध्ये लाँच केला होता. Moto E7 Plus स्मार्टफोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६४० प्रोसेसर आणि ५००० एमएएच बॅटरी दिली आहे.

Moto E7 Plus स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच सोबत येतो. हँडसेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० चिपसेट दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा दिला आहे.

मोटोच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. रियरवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी व २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आहे. रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश दिला आहे. फोनच्या मागे ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी 4जी, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक दिला आहे.

मोटोच्या या बजेट स्मार्टफोनची किंमत भारतात २३ सप्टेंबर रोजी लाँच इव्हेंटमध्ये उघड होणार आहे. लाँच इव्हेंटची सुरुवात दुपारी १२ वाजता होणार आहे. फोनला युरोपमध्ये १४९ यूरो जवळपास १३ हजार रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. परंतु, या फोनला भारतात १० हजारांच्या जवळपास किंमतीत लाँच केले जावू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button