breaking-newsताज्या घडामोडीपुणे

२० हजारांची लाच स्वीकारताना पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याला अटक

पुणे – आरोग्य सेविकेची आंतरजिल्हा बदली करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकाऱ्याला २० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवार (दि.२८) सायंकाळच्या सुमारास पुणे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात करण्यात आली.

दिलीप काशीनाथ माने असे अटक करण्यात आलेल्या आरोग्य अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला पुण्यातून नंदूरबार येथे आंतरजिल्हा बदली करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने याने ८० हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, बदलीसाठी लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. लाचलुचपत पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता माने याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, अप्पर अधिक्षक दिलीप बोरस्ते, उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक कांचन जाधव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस नाईक माळी, कुंभार यांच्या पथकाने जिल्हा परिषदेत सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून २० हजार रूपयांची लाच घेताना डॉ. दिलीप माने याला रंगेहाथ पकडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button