breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

१ फेब्रुवारी पासून होणार ‘हे’ मोठे बदल…पहा

येत्या १ फेब्रुवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे..त्याचबरोबर 1 फेब्रुवारी, 2020 पासून काही मोठे बदलही होणार आहेत…यामध्ये एलपीजी गॅसची किंमत, एलआयसी २३ योजना बंद होणार, बँक कामगारांचा संप, व्हॉट्सअ‍ॅप, एटीएम कार्डाशी संबंधित महत्वाची माहिती आहे.

1.. व्हॉट्सअ‍ॅप 1 फेब्रुवारी 2020 पासून लाखो स्मार्टफोनवर सपोर्ट करणं बंद होणार आहे. अशा परिस्थितीत, जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसह स्मार्टफोन वापरणाऱ्यांना 31 जानेवारी 2020 पर्यंत नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागेल. 1 फेब्रुवारी, 2020 पासून, व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड 2.3.7 आणि आयओएस 7 आयफोन असलेल्या स्मार्टफोनवर चालणार नाही. कंपनीने असं म्हटलं आहे की त्याच्या निर्णयाचा अनेक युजर्सवर परिणाम होणार नाही, कारण बहुतेकांकडे नवीन फोन आहेत.

2… एलपीजी सिलिंडरच्या किंमती 1 फेब्रुवारीला बदलतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसच्या किंमतीतील बदलाचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होतो. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर आणि एअर ऑईलचे दर बदलतातच…

3… भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या 31 जानेवारी 2020 नंतर सुमारे दोन डझन योजना बंद करणार आहे. नोव्हेंबर 2019 च्या अखेरीस, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ने जीवन विमा कंपन्यांना जीवन विमा आणि नवीन उत्पादनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नसलेल्या पॉलिसी बंद करण्यास सांगितले.

4… बँकेचे कामकाज ठरवण्याचा विचार करत असाल तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. कारण या आठवड्यात सलग तीन दिवस बँका देशात बंद राहणार आहेत. बँक संघटनांनी 31 जानेवारीपासून दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. म्हणजेच 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपल्यामुळे बँका बंद राहतील. 2 फेब्रुवारी रोजी रविवार आहे, म्हणून त्या दिवशीही आपण बँकेचे कोणतेही काम करू शकणार नाही

.5.. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) पुढील आढावा बैठक 6 फेब्रुवारीला होणार आहे. वाढती महागाई ,चलनवाढीचा आढावा घेतला जाणार आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 7.35 टक्क्यांवर होता आणि जानेवारीत ती आठ टक्क्यांच्या पातळीपेक्षा जास्त असू शकते. या संदर्भात एसबीआय रिसर्च रिपोर्ट ‘इकोरोप’ ने असं म्हटलं आहे की, ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर 4..62 टक्के होता तेव्हासुद्धा डिसेंबरमध्ये आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

6… टपाल खात्याने बचत खाते धारकांना त्यांचा मोबाइल नंबर अपडेट करण्यास आणि सध्या वापरात असणारं मॅग्नेटिक एटीएम कार्ड नवीन ईएमव्ही चिप आधारित कार्डासह बदलण्यास सांगितले आहे. 31 जानेवारीपर्यंत याची मुदत आहे. ईएमव्ही चिप असलेले कार्ड मॅग्नेटिक कार्डपेक्षा अधिक सुरक्षित आहे. पोस्ट विभागाच्या अधिसूचनेनुसार, ग्राहकांनी तसं न केल्यास त्यांचे कार्ड ब्लॉक होऊ शकते. टपाल विभागाचे ग्राहक त्यांच्या शाखेत जाऊन एटीएम कार्ड बदलू शकतात आणि मोबाइल नंबर अपडेट करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button