breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

विराट कोहलीकडून धोनीचा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक

हॅमिल्टन | टीम इंडिया म्हणून विराट कोहलीची कारकिर्द लांबी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि एमएस धोनीच्या नेतृत्त्वाची प्रत्येक नोंद तो आपल्या नावावर करून घेत आहे. बुधवारी विराट कोहलीनं न्यूझीलंडविरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात पुन्हा एकदा धोनीला मागे टाकले.

विराटने हॅमिल्टनमध्ये 27 बॉलमध्ये 38 धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्यानं टी20 मधील 2 धावांचा टप्पा पार करताच टी20 मध्ये तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा कॅप्टन ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी -20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन असताना धोनीनं 1,112 धावा केल्या. शेवटच्या सामन्यात तो केन विल्यमसनला मागे टाकलं होता आणि आता विराटनं तीन दिवसांनंतर धोनीलाही पुन्हा एकदा मागे टाकलं आहे.

जगात आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत कोहली तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा फॉफ डु प्लेसी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 40 सामन्यांत कॅप्टन म्हणून 1,273 धावा केल्या आहेत. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या केन विल्यमसनने 41 सामन्यांत 1148 धावा केल्या. आता विराट कोहलीनं 36 सामन्यात 1,127 धावा केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button