breaking-newsपुणे

१७ व्या ‘महाटेक २०२०’ या भव्य व्यावसायिक प्रदर्शनाची सुरुवात

महाईन्यूज | पुणे |

  • दि. ६ ते ९ फेब्रुवारी २०२० दरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सर्वांसाठी मोफत व खुले आहे.
  • या प्रदर्शनात ३०० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी झाल्या असून, भारत व भारता बाहेरील जवळपास ४०,००० ते ५०,००० हजारहून अधिक उद्योजकांनी भेट दिली.

१७ व्या महाटेक २०२० या व्यावसायिक प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन) सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे श्री प्रदीप भार्गव (अध्यक्ष- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर (एम.सी.सी.आय.ए) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे मराठे इन्फोटेक प्रा. लि चे संस्थापक श्री वसंतराव(काकासाहेब)मराठे, फ्युयेल इन्स्ट्रुमेंट्स इंजिनीयर्स प्रा.लिचे सी.ई.ओ श्री अमोद कुलकर्णी, स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लिडरशिपचे सी.ई.ओ श्री वीरेंद्र सिंग राठोड उपस्थित होते.

महाटेक – एक परिपूर्ण औद्योगिक प्रदर्शन

महाटेक २०२० साठी सहकार्य – उद्योग मंत्रालय (भारत सरकार), COSIA (चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन), TSSIA (ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन). प्रायोजक – स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लिडरशिप आणि फ्युएल इंस्ट्रुमेंट्स अँड इंजिनिर्स प्रायव्हेट लिमिटेड व नेटवर्किंग पार्टनर – सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. या प्रदर्शनात ३०० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी झाल्या असून भारत व भारता बाहेरील जवळपास ४०,००० ते ५०,००० हजार हून अधिक उद्योजकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

यावेळी बोलताना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर(एम.सी.सी.आय.ए) चे अध्यक्ष श्री प्रदीप भार्गव म्हणाले की, उद्योजकांनी योग्य व्यवसायप्रणालीच्या आधारे आपला व्यवसाय मोठा करावा. आजच्या स्पर्धात्मक जगात व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच महाटेक हे उद्योजकांना आपल्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी आदर्श व्यासपीठ आहे.

यावेळी बोलताना मराठे इन्फोटेक प्रा. लि चे संचालक श्री. विनय मराठे म्हणाले की, महाटेक ने अनेक वर्षापासून पुण्यातील उत्पादनाच्या क्षेत्रात (जो पुण्याचा पाया आहे) आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख कंपन्या महाटेक प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.

ते पुढे म्हणाले की महाटेकचे मूळ उद्दीष्ट, उत्पादन क्षेत्राचा प्रसार करणे आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदिजींचे व्हिजन ‘मेक इन इंडिया’ला पाठींबा देणे हा आहे. प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रदर्शनासह एसएमईसाठी ४ वेगवेगळ्या परिषदेचे आयोजन देखील केले आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशी डिजिटल मार्केटिंग परिषद होईल, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी व्हेंडर डेव्हेलपमेंट मीट असेल ज्यात अग्रगण्य ओईम (OEM) चा सहभाग असेल, तसेच चौथ्या दिवशी उद्योजकतेवर स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लीडरशिप ची परिषद होईल.

प्रदर्शनाचे वर्गीकरण प्रक्रिया औद्योगिक उपकरणे, इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि मशीन टूल, इन्स्त्रूमेंटेशन आणि ऑटोमेशन उपकरणे, फार्मा आणि केमिकल औद्योगिक उपकरणे, औद्योगिक आणि तांत्रिक सेवा या प्रकारामध्ये करण्यात आले आहे. महाटेकच्या बीटूबी प्रदर्शनात फक्त व्यावसायिकांचे स्टॉल असतात.

या प्रदर्शनात, प्रत्येक विभागात, भारत आणि परदेशातील अद्ययावत उत्पादने, यंत्रसामग्री, उपकरणे आणि उद्योगातील नाविन्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन केले जाणार आहे. महाटेक प्रदर्शन हे सर्व स्तरांच्या उद्योजकांसाठी एक आदर्श व्यासपीठ आहे. महाटेकच्या माध्यमातून अनेक उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपला व्यवसाय मोठा केला आहे.

अद्वितीय प्रकाशन सुव्यवस्थापनामूळे, महाराष्ट्र इंडस्ट्रीज् डिरेक्टरी ने आपला पाया औद्योगिक व्यापार मेळा व तांत्रिक परिषदा आणि औद्योगिक क्षेत्रात भक्कम केला आहे. हे औद्योगिक प्रदर्शन विवेकी लक्ष्य प्रेक्षकांना आपल्या उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी एक प्रमुख माध्यम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button