breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#’मी भाजप सोडतोय’, सोशल मीडियावर ‘हॅशटॅग’चा धुमाकूळ

पुणे |महाईन्यूज |

विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन, हे उदगार सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले. त्याप्रमाणे राज्यातील राजकीय स्थितीवरुन सकाळपासून सोशल मिडियात आता, “मी भाजपा सोडतोय” हे हॅशटॅग चर्चेचा विषय बनला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाला स्पष्ट बहूमत मिळालं नाही. त्यावरुन राजकीय पेचप्रसंग होवून राष्ट्रपती राजवट लागू झाली. काल दिवसभर हॅशटॅग ‘पुन्हा निवडणुका’ मराठी कलाकारांनी चालविली होती. त्यावरुन काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर आरोप करत राज्याला पुन्हा निवडणुकीच्या खाईत घालून कर्जाचा डोंगर वाढवायचा आहे का? असा आरोप केला. तसेच राष्ट्रवादीचे धनजंय मुंडे यांनी कलाकारांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली होती.

सोशल मिडियावर आज सुद्धा अनेकांनी हॅशटॅग वापरून सत्तास्थापनेवर चर्चा सुरु आहे. तर फेसबुकवर “मी भाजपा सोडतोय” हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देत असलेले कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरत आहे.

सद्याच्या परिस्थितीत भाजप नेते ज्याप्रमाणे वागत आहेत, हे सामान्य कार्यकर्त्यांना अजिबात आवडले नसल्याने मी भाजप सोडत असल्याचे या पोस्टमध्ये उल्लेख आहे. तर माजी पंतप्रधान व भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजपा आता राहिली नसून भाजपच्या नीतिमत्ता सोडून चाललेल्या राजकारणाला कंटाळून मी भाजप सोडतोय असेही उल्लेख ह्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.

https://www.facebook.com/shrishail.donwade/posts/2784185691645115

नगरसेवकांना टिकवून ठेवण्याचे नेत्यांपुढे आव्हान

पिंपरी-चिंचवडमध्ये देखील भाजपच्या नेत्यांना नगरसेवक फुटण्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळेच नाराज व असंतुष्ट नगरसेवकांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांनी नगरसेवकांना भीतीवजा सूचना दिल्या आहेत. भाजपच्या काही नगरसेवकांना नेत्यांची ही भूमिका आवडलेली नाही. या नाराजीतून पिंपरी-चिंचवडमध्ये देखील #’मी भाजप सोडणार’ ही मोहीम सुरू झाली तर विशेष वाटू नये. कारण, राज्यात सत्तांतर झाल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेत देखील सत्ताबदल होईल, अशी विरोधकांची भावना आहे. त्यामुळे भाजपमधील फुटणा-या नगरसेवकांना पक्षात टिकवून ठेवण्याचे आव्हान पिंपरी-चिंचवडमधील भाजप नेत्यांपुढे निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button