breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#Covid-19: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा टप्पा 55 लाखांच्या पार; 24 तासांत 75,083 नवे रूग्ण

पुणे: भारतामध्ये बघता बघता आता सहा महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 55 लाखांच्या पार गेलेला आहे. आज (22 सप्टेंबर) आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 75,083 नवे कोरोनारूग्ण समोर आलेले आहेत तर मृतांचा आकडा 1,053 आहे. सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी 55, 62,664 इतकी झालेली आहे.

यापैकी 9,75,861 रूग्णांवर उपचार देखील सुरू आहेत. 44,97,868 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 88,935 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आज आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये 6,53,25,779 सॅम्पलचे निदान झालेले आहे. तर काल दिवसभरामध्ये 9,33,185 सॅम्पल तपासण्यात आले त्यापैकी 75,083 चा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button