breaking-newsराष्ट्रिय

‘ही’ माझी जात; नरेंद्र मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. काँग्रेस नेते सी पी जोशी यांनी मोदींच्या जात आणि धर्माबाबत प्रश्न विचारले असतानाच आता नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस जातीयवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. ते विचारतात मोदींची जात कोणती?. पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान परदेशात जातो त्यावेळी देशातील सव्वाशे कोटी भारतीय हीच त्याची जात असते, असे मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राजस्थानमधील भिलवाडा येथे प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी जातीयवादाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका केली. ‘आज संविधान दिवस आहे. संविधानाचे तयार करणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातून भेदभाव नष्ट करण्यासाठी मार्ग दाखवला. तर काँग्रेस आणि त्यांचे नेते मोदींची जात कोणती?, असा प्रश्न विचारत आहे. काँग्रेस जातीयवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. जेव्हा देशातील पंतप्रधान विदेशात जातो, त्यावेळी त्याची जात एकच असते आणि ती म्हणजे ‘सव्वाशे कोटी भारतीय’, असे सांगत मोदींनी काँग्रेसवर पलटवार केला.

‘तुम्ही चार पिढी देशावर राज्य केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे यांचे उद्योग सुरु होते. पंचायतपासून संसदेपर्यंत त्यांचीच सत्ता होती. पण तुमच्या काळात ग्रामीण भागातील ४० टक्के घरांमध्येही शौचालय नव्हते. भाजपाच्या काळात आम्ही हे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत नेले. काँग्रेसने काम केले असेल तर ते हिशेब देतील. पण ते जात कोणती, वडील कोण, असेच प्रश्न विचारतील’, असा टोला त्यांनी लगावला.

मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी गरीब आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले होते. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवले, असा दावा त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button