breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

नुतन वर्षानिमित्त मावळात पार्थ पवारांची स्वतंत्र फ्लेक्सबाजी; राष्ट्रवादीच्या इच्छुकांसाठी ‘डेंजरझोन’

– विकास शिंदे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कारण, पार्थ पवार यांनी मावळातील नागरिकांना नुतन वर्षांनिमित्त शुभेच्छा देत स्वतंत्रपणे फ्लेक्सबाजी करत जोरदार ब्रॅंडिंग केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॅांग्रेसकडून इच्छुक उमेदवार डेंजरझोनमध्ये गेले असून त्यांना आयुष्यभर सतरंजी उचलण्याचे काम करावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यापार्श्वभुमीवर पार्थ पवार यांची मावळातील विविध कार्यक्रमांना स्वताः हजेरी लावण्यास सुरुवात केली. तसेच शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची छबी सवर्त्र होर्डिग्जवर झळकली होती. त्यामुळे मावळ लोकसभेसाठी त्यांचे जोरदार ब्रॅंडींग सुरु केल्याचे दिसत आहे.

तसेच पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथाॅन स्पर्धेला हजेरी लावली. त्यांनी लोणावळ्यात भाषणबाजी न करण्यास टाळले. परंतू अजित पवार यांचे चिरंजीव असल्याने त्यांची उपस्थिती तरुण कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक होती. आता पार्थ पवार यांचे मावळ लोकसभा मतदार संघातील नागरिकांना नुतन वर्षानिमित्त शुभेच्छा देणार जाहिरात फलक जागोजागी लावण्यात आले आहे. त्या फ्लेक्सवर पार्थ पवारांची स्वतंत्रपणे छबी झळकत आहे. त्यामुळे मावळात राष्ट्रवादीकडून पार्थ पवारच उमेदवार असतील यावर आता राजकीय जाणकारांनी शिक्तामोर्तब केले आहे. तसेच त्यांचा राजकारणात उतरण्याचा श्रीगणेशा मावळातूनच होत आहे.

मावळ लोकसभा मतदार संघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांत विभागला आहे. पुण्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदार संघावर राष्ट्रवादीची ताकद २०१४ पैकी मोठ्या प्रमाणात होती. तरीही २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत याठिकाणी पक्षाला विजय मिळाला नाही. २००९ मध्ये शिवसेनेकडून गजानन बाबर आणि २०१४ मध्ये श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. आता या मतदार संघातून पार्थ पवार आपला करिष्मा दाखविणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यासह अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी मावळात जनसंर्पक वाढविण्यास सुरुवातही केले आहे. परंतू, अचानक पार्थ पवारांचे नाव चर्चेला आल्याने इच्छुक उमेदवार डेंजरझोनमध्ये गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button