breaking-newsमराठवाडा

हिमायतनगर NSUI तालुका अध्यक्ष पद 3 वर्षापासून रिक्त !

हिमायतनगर | तालुक्यात मागील 3 वर्षा पासून नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) चे तालुका अध्यक्ष पद रिक्त आहे त्यागोष्टीची जिल्हा अध्यक्ष शंकर पाटील शिंदे, हिमायतनगर काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर,शहर अध्यक्ष संजय माने यांनी तात्काळ दखल घेऊन ह्या जागी नवीन तरुण तडफदार युवा कार्यकर्त्यांची वर्णी लावावी अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.

नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI)ह्या संघटनेचे जाळे देशभर पसरले आहे त्यामुळे ही संघटना असंख्य विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करते आशा देशव्यापी पसरलेल्या संघटनेचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष हे पद मागील 3 वर्षापासून रिक्तआहे ही सर्वात मोठी खेद जनक बाब आहे ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांची शहरी भागात पीळवनुक होत असते. असंख्य गरीब कुटुंबातील विद्यार्थाना शहरी भागातील कॉलेज व शाळा मध्ये प्रवेश मिळत नाही तेव्हा अशा संघटनेमुळे त्या विद्यार्थाना प्रवेश मिळण्यास मदत होते अशी कार्यक्षम संघटना जर का शहरात अस्तित्वात असेल तरच गोर गरीब जनतेस न्याय मिळतो त्यामुळे मागील 3 वर्षापासून रिक्त असलेले हिमायतनगर तालुका अध्यक्ष ह्या पदावर युवा तरुण तडफदार कार्यक्षम युवा नेतृत्वाची निवड करावी अशी मागणी असंख्य विद्यार्थान कडून होत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button