breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘डिजिटल इंडिया’मुळे जनसामान्यांचे सबलीकरण -प्रसाद

केंद्र सरकारची डिजिटल इंडिया मोहीम ही व्यापक जनसमुदायाला नव्या डिजिटल युगाचे व्यासपीठ खुले करणारी ठरली असून, यातून देयक व्यवहार ते शिक्षण यापासून ते वैद्यकीय मदतीसारख्या सेवा जनतेला अल्पदरात आणि सुलभतेने उपलब्ध होत असून, हा उपक्रम म्हणजे एका परीने डिजिटल सर्वसमावेशकता साधणाराच असल्याचे प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केले. ‘एक्स्प्रेस आयटी अ‍ॅवॉर्ड्स’ सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साधलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून जनसामान्य भारतीयांचे सबलीकरण शक्य बनविणाऱ्या उद्योगांचा यथोचित सन्मान ‘एक्स्प्रेस आयटी अ‍ॅवॉर्ड्स’च्या माध्यमातून केला जातो, असे गौरवोद्गार प्रसाद यांनी काढले.

नव्या युगाचा प्रवाह असलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाने खुल्या केलेल्या सेवा-सुविधांचा अत्यल्प किंमत मोजून लाभ हे सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्टय़ असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. याचे उदाहरण सांगताना, आधार आणि डिजि-लॉकर प्रणाली आज देशाच्या दुर्गम क्षेत्रातील व्यक्तीसाठीही विनासायास आणि सहजसाध्य बनली असल्याचे त्यांनी सांगितले.

सहजसाध्य डिजिटल प्रणालीने एकीकडे देशातील उद्यमशील चेतनेला जागविण्याचे तर दुसरीकडे ग्रामीण जनसंख्येच्या नवतंत्रज्ञानाबाबतची आस दोहोंची पूर्तता केली आहे.

ज्ञानाधारित उद्योग क्षेत्रातील नामांकितांच्या उपस्थितीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात विनीत नय्यर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर २०१८ सालातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर उत्पादनाचा पुरस्कार ‘डार्विनबॉक्स डिजिटल सोल्युशन्स’ला, वर्षांतील सर्वोत्तम स्टार्ट-अपचा पुरस्कार ‘डेटा एक्सजेन टेक्नॉलॉजीज’ला आणि ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ म्हणून विमल कुमार यांना गौरविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button