breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हिजबुलच्या कमांडरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरात सुरक्षा दलाला मोठं यश

श्रीनगर | श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला आज मोठं यश मिळालं. या चकमकीत हिजबुलच्या एका टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दहशतवादी लपून असलेलं घर सुरक्षा दलांनी उडवून दिलं. गेल्या काही महिन्यांमध्ये राजधानी श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच अशी मोठी चकमक झाली आहे. मारला गेलेला दहशतवादी जुनैद सहराई हा कट्टर विभाजनवादी नेते मोहम्मद सहराई यांचा मुलगा आहे. या चकमकीत सुरक्षा दलांचे तीन जवानही जखमी झालेत. ही चकमक सुरू असतानाच नागरिकांनी दहशतवाद्यांच्या बचावासाठी दगडफेक केली होती. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना हुसकावून लावलं. आणि आजुबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला. हिजबुलचा प्रमुख रियाज नायकू ठार झाल्यानंतर जुनैदचं ठार होणं हे सुरक्षा दलाला मिळालेलं मोठं यश आहे. दोन वर्षांनंतर श्रीनगरमध्ये रात्री उशिरा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कोरोना व्हायरसच्या महासंकटाचा सामना करत असतानाच रात्री उशिरा कानेमजार नवाकदल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चमकम झाली. या चकमकीनंतर श्रीनगरमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद कऱण्यात आली आहे.

सुरक्षा दल आणि पोलिसांनी मिळून दहशतवाद्यांविरोधी केलेल्या सर्ज ऑपरेशनदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्य दलानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काही दहशतवादी घरांमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवान-पोलिसांनी हे सर्ज ऑपरेशन सुरू केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button