breaking-newsमहाराष्ट्र

हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टवर जितेंद्र आव्हाडांसह ४ जण; एटीएसची कोर्टात माहिती

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टमध्ये श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर आणि रितू राज यांचा देखील समावेश होता, अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.

एटीएसने गेल्या आठवड्यात शनिवारी अविनाश पवार (३०) या तरूणाला घाटकोपरमधून ‘गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्या’न्वये (यूएपीए) अटक केली होती. अविनाश पवारची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केस डायरीचे वाचन केले. केस डायरीतून श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर आणि रितू राज हे हिंदू कट्टरपंथीयांच्या रडारवर होते, अशी माहिती समोर आली आहे. यातील श्याम मानव यांच्यासाठी कट्टर हिंदूत्ववाद्यांनी रेकी केल्याचे यात म्हटले आहे.

नालासोपारासह राज्याच्या अन्य भागातून हस्तगत केलेली स्फोटके, शस्त्रसाठ्याशी आणि त्याप्रकरणी अटकेत असलेल्या कट्टरवाद्यांशी पवारचा संबंध पुढे आल्यानंतर पोलिसांनी अविनाश पवारला अटक केली होती.

या प्रकरणात याआधी अटकेत असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर यांच्या चौकशीतून पवारचे नाव पुढे आले. अतिरेकी, घातपाती कारवयांचा कट आखणाऱ्या गटाचा पवार सक्रिय सदस्य होता, छापेमारीत हस्तगत गावठी बॉम्ब त्यानेच तयार केले, असा संशय एटीएसने गेल्या सुनावणीत व्यक्त केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button