breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार; बस कंडक्टरने घेतला गळफास

मुंबई – दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे.

करोना महामारीमुळे ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे एसटी कर्चचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्व एसटी कर्मचारी चिंतेत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज चौधरीच्या आत्महत्येमुळे जळगाव शहरात आणि एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button