breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंदुत्वादी विचारधारेमुळे आज, उद्या अन्ं भविष्यातही शिवसेना आमच्यासोबत राहणार

– प्रदेश भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांची पत्रकार परिषदेत माहिती 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘‘आमची हिंदुत्ववादी विचारधारा असून, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसमवेत युती होईल. तसेच आज, उद्या कल और भविष्यातही आम्ही शिवसेनेसोबत राहणार आहोत.  देशातील काही विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाला आहे. मात्र, आम्ही ती हार झाल्याचे मानत नाही. आगामी काळात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, ’’ असा विश्‍वास प्रदेश भाजप प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण समाजासाठी १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबाबत शहर भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आदी याप्रसंगी उपस्थित होते.

शालिनी म्हणाल्या, ‘‘केंद्रातील यूपीए सरकारच्या काळात सिन्हो आयोगाने सवर्ण समाजातील आर्थिक मागासांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सरकारने त्यावर पूर्णतः निर्णय घेतला नाही. काँग्रेससह काही पक्ष आर्थिक मागास आरक्षणाला अनुकूल असल्याने राज्यसभेतही विधेयक संमत होईल.’’

शिवसेनेसमवेत आम्ही पूर्वीही होतो. आत्ताही आहोत. आणि पुढेही राहणार आहोत, असे सांगून शालिनी म्हणाल्या, ‘‘आम्ही दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी विचारधारा मानतो. त्यामुळे शिवसेनादेखील आमच्या सोबत राहावी अशीच आमची इच्छा आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील.’’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button