breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगोलीत 3.2 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप

हिंगोली – हिंगोली जिल्हा रात्री १२.४१ वाजताच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर 3.2 इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. सुदैवाने यात कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. दरम्यान, यापूर्वी गेल्या मंगळवारी पुणे जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.6 इतकी नोंदवली गेली. पुरंदर तालुक्यात 7 वाजून 28 मिनिटांनी हा धक्का जाणवला होता. त्याचे केंद्र पुरंदरमध्येच 12 किलोमीटर खोलवर होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली.

तर २८ जानेवारीच्या सकाळी राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.८ इतकी नोंदविण्यात आली होती. या भूकंपाचे केंद्र पश्चिम दिल्लीत १५ किलोमीटर खोलवर होते. तसेच १३ जानेवारीला नोएडा भागही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button