breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंगणघाट येथील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, भाजपचे आंदोलन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

हिंगणघाट येथील पीडित प्राध्यपिकेच्या मृत्युस जबाबदार असणा-या क्रुरकर्मी प्रवृत्तीचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली.

मोरवाडीतील पक्ष कार्यालयासमोर आज मंगळवारी (दि. 11) आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी महापौर उषा ढोरे, माजी महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सभागृह नेते एकनाथ पवार, पीसीएनटीडीएचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायीच्या माजी सभापती सीमा सावळे, भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, तुषार कामठे, महिला शहराध्यक्षा शैला मोळक, नगरसेविका सोनाली गव्हाणे, आशा शेंडगे, आशा काळे, शहर भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात, माजी नगरसेवक राजु दुर्गे, आदी सहभागी होते.

हिंगणघाटमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. देशातील पर्यायाने राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. कायदा व सुव्यवस्था कुचकामी ठरत असल्यामुळे महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. क्रुर कृत्य करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. त्यामुळे समाजात अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती तयार होणार नाहीत. त्याला कायमचा आळा बसेल. पीडित मुलीच्या कुटुबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले.

‘झालीच पाहिजे…, झालीच पाहिजे…, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे…’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांनी हातावर काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग नोंदवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button