breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“हा भारत महात्मा गांधी, नेहरुंचा नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आहे” -भाजपा आमदार लीला राम गुर्जर

हरियाणा | महाईन्यूज

भाजपा आमदाराने हा देश महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु यांचा नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आहे असं वक्तव्य केलेलं आहे. हरियाणामधील कैथल जिल्ह्यात सुधारित नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ प्रचारसभा आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी भाजपा आमदार लीला राम गुर्जर यांनी हा नवा भारत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आहे असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

“हा नवा भारत महात्मा गांधी, नेहरु आणि मनमोहन सिंग यांचा नाही. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा भारत आहे. तुम्ही बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरुन लोक येऊन धमकावत असल्याचं ऐकलेलं असेल पण मित्रांनो हा नरेंद्र मोदींचा भारत आहे, आदेश मिळाला तर एका तासांत तोंड बंद केलं जाईल,” असं लीला राम गुर्जर यांनी म्हटलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button