ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली गुप्त माहिती; कारवाई करतात हाती लागले मोठे घबाड

परभणी| परभणी येथील दहशतवाद विरोधी कक्षाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिंतूर शहरातील जमजम कॉलनी आणि तालुक्यातील आडगाव येथे कारवाई करत ५९ हजार रुपये किंमतीचा ५ किलो ९०० ग्रॅम गांजा पकडला आहे. ही कारवाई बुधवार ४ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन आरोपीवर जिंतूर पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथक अवैध धंद्याची माहिती काढत जिंतूर पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पथकाला जिंतूर शहरातील जमजम कॉलनीत जावेद खान अब्दुल वहीद खान आणि आडगाव येथील शंकर किशन दाभाडे गांजा असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन जिंतूर शहरातील जमजम कॉलनी आणि आडगाव येथे कारवाई करत ५ किलो ९०० ग्रॅम गांजा अवैध गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांच्या फिर्यादीवरुन जिंतूर येथील आरोपी जावेद खान अब्दुल वहीद खान आणि आडगाव येथील आरोपी शंकर किशन दाभाडे यांच्याविरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास कोकाटे करत आहेत. पोलिस निरीक्षक दिपक दंतुलवार, पोलिस कर्मचारी भारत नलावडे, जावेद खान, सुनिल राठोड, रामकिशन काळे, अरुण कांबळे, अजहर पटेल, सय्यद जाकेर अली, आरेफ कुरेशी यांचे पथक

दहशतवादी विरोधी कक्षाच्या पथकाने जिंतूर तालुक्यामध्ये केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांचे झाले दणाणले आहेत. दरम्यान दहशतवादी विरोधी कक्षाच्या पथकाने जिंतूर तालुक्यात अवैध गांजा पकडणे जिंतूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. यापुढेही संपूर्ण जिल्ह्यामध्ये दहशतवादी विरोधी कक्षाकडून अवैध धंदे चालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button