breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हाथरस प्रकरणी CBI ने दाखल केला FIR, तपासासाठी पथक

हाथरस – येथे दलित मुलीच्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. या बरोबरच सीबीआयने या प्ररणात आपला तपासही सुरू केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनुसार सीबीआयने हा एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने एका पथक गठीत केले असून, पथकाने आपला तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने हाथरस प्रकरणी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या पूर्वी पीडिचेच्या भावाने हाथरसच्या चंदपा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १४ सप्टेंबर २०२० रोजी आरोपीने आपल्या बहिणीला बाजरीच्या शेतात गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारदार भावाने केला होता.

आता सीबीआयने हाथरस प्रकरण आपल्या हाती घेतले आहे. या घटनेला २७ दिवस झाले आहेत. प्रथम हाथरस पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर एसआयटी आणि आता सीबीआयने या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

आतापर्यंत या प्रकरणाची तपास एसआयटी करत होती. १४ सप्टेंबरचे सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी एसआयटीने तपास सुरू केल्यानंतर एसआयटीच्या निशाण्यावर गावातील ४० लोक होते. गावातील या ४० लोकांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे. घटना घडली तेव्हा हे ४० लोक शेतांमध्ये काम करत होते. यांमध्ये आरोपी आणि पीडितेचे कुटुंबीयांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, हाथरस प्रकरणातील पीडित कुटुंबीय लखनऊला जात आहेत. उत्तर प्रदेश पोलिस कडक सुरक्षेत पीडित कुटुंबीयांना लखनऊला घेऊन जातील. उद्या, १२ ऑक्टोबरला अलाहाबाद हायकोर्टाच्या पीठासमोर हाथरस प्रकरणाची सुनावणी होईल. यासाठी पीडित कुटुंबातील ५ लोक आणि काही नातेवाईक लखनऊला रवाना होतील. उत्तर प्रदेश पोलिस पीडित कुटुंबीयांना आपल्या संरक्षणात लखनऊला घेऊन जातील. उत्तर प्रदेशचे पोलिस उपमहानिरीक्षक शलभ माथुर यांनी गावात जाऊन तयारीचा आढावा देखील घेतला आहे.

१ ऑक्टोबरला अलाहाबाद हायकोर्टाने या घटनेची दखल घेत उत्तर प्रदेशच्या गृह खात्याचे मुख्य सचिव अवनीश अवस्थी. पोलिस महासंचालक हितेशचंद्र अवस्थी, सहाय्यक पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांच्या व्यतिरिक्त हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार आणि पोलिस अधीक्षक राहिलेले विक्रांत वीर यांना देखील बोलावण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button