breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

हातावर शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांत द्या: पाटील

मुंबई | हातावर शिक्का मारून घरात क्वॉरंटाइन करण्याचा सल्ला दिलेला असतानाही काही लोक घराबाहेर सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. असे लोक घराबाहेर फिरताना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना कळवा. त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. करोनाचा आजार अत्यंत गंभीर आहे. त्याची जगभरातील आकडेवारी पाहिल्यानंतर हा आजार किती गंभीर असून करोनाचं संकट किती भयंकर आहे, हे लक्षात येतं. हा आजार संपर्क आणि संसर्गाने होतो. त्यामुळे घरातच राहा. बाहेर फिरू नका.

अमेरिका, चीन, इटली, स्पेन आणि जर्मनी येथील लोकही घराबाहरे पडत नाहीत. आपल्याला काहीच होणार नाही, असा अति आत्मविश्वास बाळगू नका. काही लोकांना पुढारपण करण्याची सवय असते. त्यांनी पुढारपण करू नये. तसेच खाण्यापिण्याच्या वस्तू वाटपाच्या बहाण्याने काही लोक ग्रुप करून बाहेर पडत आहेत. त्यांनीही ग्रुपद्वारे फिरू नये. तुमच्या ग्रुपमधील एखाद्यालाही करोनाची बाधा झालेली असू शकते. याचं भाग ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button