breaking-newsपिंपरी / चिंचवड

हातगाडी, फेरीवाल्याकडून अतिक्रमण शुल्काबाबत विचार करु

फेरीवाला क्रांती महासंघाला भाजप नेत्यांचे आश्वासन 
पिंपरी – महापालिका स्थायी समितीने हातगाडी ,टपरी धारकाकडून सुमारे 6400, 12800, व 3800 रु अतिक्रमण शुल्क ,प्रशासकीय शुल्क आकारण्याचा ठराव केला आहे ,हा अन्यायकरक असून तो रद्द करावा या मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने  आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम  पानसरे ,पक्षनेते एकनाथ पवार  यांना निवेदन देऊन चर्चा केली.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते,कार्याध्यक्ष राजू बिराजदार, समंव्ययक इरफान चौधरी, कासीम तांबोळी,रामा बिरादार,संचित तिखे,अम्बालाल सुखवाल,हरी भोई,बाळासाहेब सोनवणे, पप्पू तेली,देवीलाला अहीर आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड मनपा कडून फेरीवल्यावर अन्यायकारक कारवाई सुरु असून यात परवाना धारक विक्रेत्यांवर हि कारवाई सुरु आहे ,यात त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे ,हॉकर्स झोन न करता मनपा दडपशाही करत आहे. तर बंद करावे आदी मागण्या आज मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर यांना भेटून चर्चा केली .
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button