breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांचा चंद्रकांत पाटीलांना टोला; म्हणाले, कोथरूडसाठी त्याचं योगदान तरी काय?

चंद्रकांत पाटील हे फार शक्तिमान ग्रहस्थ आहेत- शरद पवार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या शिवराज राक्षे याचा सत्कार करण्यात आला. यावेळेस शरद पवारांनी सत्कार केल्यानंतर पत्रकारांशी विविध विषयांवर ती गप्पा देखील मारल्या आहेत. यावेळेस शरद पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र चंद्रकांत पाटील यांना देखील खडे बोल सुनावले आहेत.
चंद्रकांत पाटील हे फार शक्तिमान ग्रहस्थ आहेत ते त्यांचं कोल्हापूर सोडून इकडे पुण्यामध्ये कोथरूडला निवडणूक लढवायला आले नेमकं त्यांचं कोथरूड साठी योगदान तरी काय?, असा सवाल शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना विचारला आहे. ज्या माणसांमध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये निवडून येण्याची क्षमता नाही त्याच्यावर काय भाष्य करावं, असा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
सोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसकडे औरंगाबादची जागा, नागपूरची जागा शिवसेनेला आणि अमरावती आणि नाशिकची उमेदवारी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघातील सध्याचे चित्र पाहता काळजी करण्यासारखेच आहे. हा विषय नीट हाताळता आला असता.
काँग्रेसने ज्यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यांचे काम आणि सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका चांगली आहे. मात्र तरूण कार्यकर्त्यांचा अर्ज आल्यानंतर चर्चेने हा प्रश्न सोडविता आला असता. ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे, ते युवक चळवळीशी सक्रिय आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांनी आपासपसात चर्चा करून प्रश्न सोडविणे अवघड नव्हते. बाळासाहेब थोरात पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. विधिमंडळाचे ते गटनेता आहेत. टोकाची भूमिका ते घेत नाहीत. त्यामुळे सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button