breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापाैर, उपमहापाैर पदासाठी रस्सीखेच ; विविध पक्षाकडून 20 अर्ज घेवून गेले

पिंपरी –  पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्ताधारी भाजपचे महापाैर नितीन काळजे व उपमहापाैर शैलेजा मोरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर उद्या (मंगळवारी) महापालिकेत महापाैर व उपमहापाैर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. महापाैर व उपमहापाैर पदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून प्रत्येकी चार-चार आणि शिवसेनेचे दोन-दोन असे एकूण तब्बल 20 अर्ज घेवून गेले आहेत. त्यामुळे दोन्हीही पदासाठी चांगली रस्सीखेच होणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. महापालिकेत भाजपचे तब्बल 80 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 38, शिवसेनेचे 9, अपक्ष 5 आणि मनसेचे 1 असे संख्याबळ आहे.  महापालिकेचे महापाैर पद इतर मागास प्रर्वगासाठी राखीव आहे. त्यामुळे महापाैर व उपमहापाैर पदावर सव्वा-सव्वा वर्षे संधी देण्याचे भाजपच्या नेत्यांचे एकमत झाले. त्यानूसार भाजपचे प्रथम महापाैर म्हणून  च-होलीतील नितीन काळजे तर उपमहापाैर पदी शैलेजा मोरे यांना संधी देण्यात आली. त्या दोघांचा सव्वा वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेशानूसार त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. महापाैर काळजे व उपमहापाैर मोरे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.

महापालिकेच्या महापाैर व उपमहापाैर पदाची निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यानूसार 31 जूलैला दुपारी 3 ते 5 यावेळेत दोन्ही पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. तर 4 आॅगस्ट महापाैर व उपमहापाैर पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानूसार महापाैर व उपमहापाैर पदासाठी भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेसने प्रत्येकी चार-चार अर्ज तर शिवसेनेने प्रत्येकी दोन-दोन अर्ज महापालिका नगरसचिव कार्यालयातून घेवून गेले आहेत. त्यामुळे दोन्ही पदाकरिता चांगलीच रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button