breaking-newsताज्या घडामोडीपुणे

हाऊसिंग बोर्डमधील झाडांच्या फांद्या हटविल्या

– येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील वृक्ष प्राधिकरण विभागाची कार्यवाही

पुणे | प्रतिनिधी

महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील एम 28 या इमारतीजवळ झाडांच्या मोठया फांद्या टाकण्यात आल्या होत्या. १५ दिवस होऊनही संबंधित ठेकेदारांनी या फांद्या हटविल्या नाही. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. त्याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. या बातमीच्या दणक्याने येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील वृक्ष प्राधिकरण विभागाने महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील झाडांच्या फांद्या हटविण्याची कार्यवाही केली. या मुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

हाऊसिंग बोर्डमध्ये तोडलेल्या झाडांच्या फांद्या नागरिकांच्या घराबाहेर खाजगी ठेकेदाराने तशाच टाकून दिल्या होत्या. यामुळे या परिसरात डासोत्पत्ती वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी नागरिक व्यक्त करत होते. झाडांच्या मोठ्या फांद्या दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ तशाच पडून होत्या. वृक्ष तोड केल्यानंतर संबंधित वृक्षाच्या फांद्या घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असते. मात्र वृक्ष तोड करायला आलेले ठेकेदार फांद्या बिनदास्तपने नागरिकांच्या दारात टाकून निघून जात आहेत. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button