breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

हर्षवर्धन पाटील कन्येसह राज्यपालांच्या भेटीला

इंदापूर | भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. पुण्यात झालेल्या या भेटीच्या वेळी हर्षवर्धन यांच्या कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटीलही उपस्थित होत्या. भेटीमुळे अधिक जिद्दीने काम करण्यास विचारांची नवीन ऊर्जा मिळाल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रशासन व राजकारणाचा असलेला प्रदीर्घ अनुभव यावेळी त्यांच्या बोलण्यातून व संकल्पनेतून जाणवला, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. सोमवारी झालेल्या चर्चेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर संवाद साधला.

युवा पिढीने राजकारणात सक्रीय होऊन जनसेवा करावी यासाठी ते आग्रही दिसले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे सकारात्मक विचारांची मोठी शिदोरी असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राज्यपाल हे प्रचंड अनुभवी व या वयातही जिद्दी असल्याचे जाणवले, त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला निश्चितपणे होईल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनीही सहभाग घेतला. राज्यपालांशी झालेल्या भेटीमुळे अधिक जिद्दीने काम करण्यासाठी विचारांची नवीन ऊर्जा मिळाल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button