breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हत्या प्रकरणातील पीडित पवार कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट

बीड | बीड जिल्ह्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल, असे धनंजय मुंडे म्हणाले.

सदर प्रकरणातील दोषारोपपत्र 50 दिवसांच्या आत दाखल करावे अशा सूचना धनंजय मुंडेंनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान सामाजिक न्याय विभागामार्फत हत्या झालेल्या पीडित कुटुंबियांना 13 लाख रुपये मदत देण्यात आली आहे. शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. तिथे झालेल्या वादातून तीन जणांची गुरुवारी निर्घृण हत्या करण्यात आली. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मांगवडगाव इथे घडली असून तिहेरी हत्येनं बीड हादरलं. मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button