breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#coronolockdown:सांगलीतील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये 20 टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरु

सांगली : सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये 20 टक्के कर्मचाऱ्यांनिशी पंप बनवण्याच्या कामाला आज (25 एप्रिल) सकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे. किर्लोसकर समूहाला काल (24 एप्रिल) लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत उद्योग सुरु करण्याची परवानगी मिळाली होती.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील सत्तावीस मोठे उद्योग पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या पंप बनवण्याच्या कंपनीला आपला उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली गेली आहे.

किर्लोस्करवाडीमधील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये काल संपूर्ण परिसर, मशिनरी विभागात औषध फवारणी करुन परिसर निर्जंतुक करण्यात आला. तसंच काही कर्मचाऱ्यांची सोशल डिस्टन्स पाळून राहण्या, खाण्यापिण्याची सोय करण्यात आली. आज सकाळपासून खऱ्या अर्थाने 20 टक्के कर्मचाऱ्यांच्या बळावर किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये काम सुरु झालं आहे.

दरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्यास सांगण्यात आलं आहे. तर काही कर्मचाऱ्यांची खास बसने ने-आण केली जाणार आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button