breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल
पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अचानकपणे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. राजू शेट्टी यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शेट्टी हे या रुग्णालयात नियमीत तपासणीसाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. शेट्टी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटलेले आहे.