breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जेएनयूत राडा ; रात्री मास्कधारी गुंडांचा मुलींच्या वसतीगृहात हैदोस

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे.

जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करतायेत. एक तोंडाला बांधलेला गुंड मुलींना धमकावण्याच प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या.

विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह 20 जण रुग्णालयात –
हल्ल्याचा हा व्हिडीओ जेएनयूच्या साबरमती वसतीगृहाचा असून यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोषवरही जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तिचं डोकं फुटलं असून ती गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या आईशासह अन्य 20 विद्यार्थ्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली आहे.

फी वाढीवरुन घटना घडल्याची माहिती –

ही घटना विद्यापीठातील फी वाढीच्या मुद्द्यावरुन झाल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी विद्यार्थ्यांचे दोन गट आपापसात भिडले. त्यावेळी प्राध्यापकही तिथे उपस्थित होते. त्यांनाही यात मारहाण झाली आहे. एक गट फी वाढीचा विरोध करत होता, तर दुसरा गट विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी आग्रही होता. याच मुद्द्यावरुन दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. ज्याचे पर्यवर्सन नंतर मारहाणीत झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विद्यापीठात झालेल्या हल्ल्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. डाव्या संघटना आणि एभीवीपी ऐकमेकांवर आरोप दर्शवत आहेत.

  • घटनाक्रम
  • सायंकाळी 4 वाजता : साबरमती वसतीगृहाच्या टी प्वाइंट येथील छात्रसंघ भवन येथे सभा सुरू होती.
  • 5 वाजता : सभेदरम्यान एबीवीपीचे कार्यकर्ते आणि छात्रसंघाच्या विद्यार्थ्यांमध्ये वादावादी, परिसरात तणाव
  • 6 वाजता : मारहाणी विरोधात छात्र संघटनेकडून रॅलीचे आयोजन, दोन्हीबाजूने दगडफेक
  • 6:20 वाजता : मास्कधारी गुडांचा हल्ला –
  • रात्री 8:10 वाजता : पोलिस घटनास्थळी दाखल
  • 9:15 वाजता : पोलिस मुख्यालयाच्या जवळ जामिया विद्यार्थ्यांचा हल्लेखारांविरोधात कारवाईसाठी आंदोलन
  • रात्री 10 वाजता : पोलीसांचा विद्यापीठ परिसरात ध्वज मार्च
  • रात्री 12 वाजता : समर्थक विद्यापीठ परिसरात दाखल होण्यास सुरुवात.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button