breaking-newsपिंपरी / चिंचवड

स्वच्छंद्र कलाकृती चित्रप्रदर्शन स्पर्धेत समीरा ठाकूर प्रथम

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील तुलिका आर्ट गॅलरीच्या वतीने आयोजित स्वच्छंद कलाकृती स्पर्धेमध्ये समीरा ठाकूर व मुलीने प्रथम क्रमांक पटकाविला.

मुलांमध्ये चित्रकलेविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्या हातून स्वच्छंद कलाकृती घडाव्यात, निर्माण व्हाव्यात यासाठी तुलिका आर्ट गॅलरीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या भागातील ४६ विद्यार्थ्यांनी त्यामध्ये भाग घेतला होता. वय वर्षे तीन ते सहा या वयोगटातील मुला-मुलींनी यामध्ये सहभाग नोंदविला. प्रसिद्ध कलाभ्यासक अनामिका क्षिरसागर, अश्विनी गायकवाड व लेखक विजय जगताप यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

त्यामध्ये समीरा ठाकूर (प्रथम), हितेश मुलचंदानी (द्वितीय) अर्नव मुंदडा (तृतीय) तर ग्रुप विजेत्यांमध्ये बानी कौर, युवराज गोयल, रिद्धी आनंद, अनुष्का मुथा, अदविका देलूखर, निव कर्माकर, यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी सरिषा अग्रवाल, वृंदा नय्यर, अदविका -बियाणी, रिषा लढे, पर्ल केवलरामाणी, त्रिजल अग्रवाल, अनुष्का पोरलीकर, अंश पोंधे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. वर्षा सोनकर, सतिश सोनकर, नितीन गोयल, संकेत वाढे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button