breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्मार्ट वॅाच’ खरेदीत नागपूर कनेक्शन ; पारदर्शक कारभारात कोट्यावधीचा थेट तिजोरीवर डल्ला

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांसह कंत्राटी कर्मचा-यांना ‘स्मार्ट वॅाच’ खरेदी करण्यात येणार आहे. नागपूरच्या मे.आय.टी.आय.लिमिटेड बेंगलोर संस्थेकडून चार वर्षात सुमारे 6 कोटी 25 लाख 98 हजार 144 रुपयाची थेट खरेदी करण्याचा घाट घातला आहे. हा प्रस्ताव उद्याच्या स्थायी समितीसमोर ऐनवेळी ठेवला जाणार आहे. त्यामुळे पालिका आयुक्त श्रावण हर्डिकरांनी स्मार्ट वॅाच खरेदीत मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन ही कोणाला तरी डोळ्यासमोर निविदा प्रक्रिया राबविल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिका आरोग्य विभागाकडील स्वच्छतेचे कामकाज करणा-या सहायक आरोग्य अधिकारी,आरोग्य निरीक्षक,आरोग्य मुकादम व सफाई कर्मचारी तसेच घंटागाडी ठेकेदार व स्वच्छता विषयक ठेकेदारांकडील आरोग्य कामगार स्मार्ट वॅाच खरेदी करण्यात येणार आहे.

एक घड्याळ तब्बल ४ हजार ५४४ रुपये असून मे.आय.टी.आय.लि. बेंगलोर या संस्थेकडून थेट पध्दतीने प्रथमता चार वर्षासाठी प्रत्येक नगासाठी दरमहा २८७ रुपये अधिक जीसीटी या दराने उपलब्ध करणार आहेत. त्यात दरमहा १३ लाख ४ हजार १२८ रुपये आणि एक वर्षासाठी एकूण १ कोटी ५६ लाख ४९ हजार ५३६ रुपये आहे. त्यामुळे चार वर्षासाठी एकूण ६ कोटी २५ लाख ९८ हजार १४४ रुपये अधिक जीएसटी प्रमाणे येणा-या खर्चास मान्यता देण्यात येणार आहे.  तब्बल साडे सहा कोटीची डिजीटल घड्याळे थेट पध्दतीने उपलब्ध करुन खरेदीसाठी चांगलीच घाई करण्यात येत आहे. थेट पध्दतीने घड्याळे उपलब्ध करुन घेण्याऐवजी रीतसर निविदा मागविल्या असत्या तर निकोप स्पर्धा होऊन यापेक्षा स्वत: दरात स्मार्ट घड्याळे उपलब्ध झाली असती. तसेच गुणवत्ता, दर्जेदार मिळाली असती.

नागरीकांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम खरेदी अथवा भाड्याने हे शब्द न वापरता उपलब्ध करुन देणे असे शब्द वापरले आहेत. याबाबत सविस्तर स्षटीकरण होणे आवश्यक आहे.आणी जर भाड्याने स्मार्ट घड्याळे घेणार आहोत तर मग एवढ्या रकमेत आपण कितीतरी स्मार्ट घड्याळे आपण खरेदी करु शकणार नाही का? तसेच सदर विषयपत्रामध्ये स्वच्छता विषयक ठेकेदारांकडील आरोग्य कामगार याचेसाठीही स्मार्ट घड्याळे मनपा घेणार आहे. स्वच्छता ठेकेदारांना मनपाने ठेका दिलेला आहे व त्यासाठी मनपा लाखो रुपये मोजत आहे. या खाजगी स्वच्छता कामगारांना मनपामार्फत स्मार्ट घड्याळे कशासाठी पुरविणेत येत आहेत? हि जबाबदारी ज्याने स्वच्छतेचा ठेका घेतला आहे, स्मार्ट घड्याळे कामगारांना पुरविण्याची त्याची जबाबदारी नाही का? का ठेकेदारांना पोसायची कामे मनपा करणार आहे काय? व सदरची निविदा रद्द करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button