breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

स्थायी समितीच्या विशेष सभेत 14 कोटींच्या कामांना मंजुरी

  • स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांची माहिती 

पिंपरी ( महा ई न्यूज )- पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी स्थायी समितीने आज (मंगळवारी) झालेल्या सभेत सुमारे १४ कोटी ७६ लाख ४ हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली. 

महानगरपालिकेच्या स्थायी समितीची आज (मंगळवारी) विशेष सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.  रावेत येथील जलउपसा केंद्र व्ही.टी पंपाची वार्षिक पध्दतीने देखभाल दुरुस्ती येणा-या सुमारे ४५ लाख १३ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र.१ चिखली उर्वरीत रस्ते डांबरीकरण साठीच्या येणा-या सुमारे ४१ लाख ८५ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. १ म्हेत्रेवस्ती व इतर परीसरातील रस्त्यांचे डांबरीकरण विषयककामे करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ४४ लाख रुपयांच्या खर्चास, मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत ४ नग उदवाहक बसविणेत आले आहेत. त्यांचे देखभाल दुरुस्तीसाठी येणा-या सुमारे २ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातंर्गत नेहरुनगर, पिंपरी येथे छोटे पाळीव प्राणी दहन मशिन घेण्यासाठी येणा-या २३ हजार रुपयांच्या खर्चास, महापालिका हददीतील मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवणेच्या कामासाठी येणा-या सुमारे ९० लाख ८२ हजार रुपयांच्या खर्चास, चिखली येथील सोनवणेवस्ती, शेलारवस्ती, इतर परिसरातील पाणीपुरवठा विभागाच्या कामामुळे रस्ता खोदाई कामामुळे रस्ते पुर्ववत करणेसाठी येणा-या सुमारे ४९ लाख २७ हजार रुपयांच्या खर्चास, येथील सोनवणेवस्ती, शेलारवस्ती,व इतर परिसरातील पाणीपुरवठा विभागाच्या कामामुळे रस्ता खोदाई कामामुळे रस्ते पुर्ववत करणेसाठी येणा-या सुमारे ४६ लाख ३९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पीएमपीएमएल संस्थेस विविध प्रकारचे पासेसपोटी रक्कम रूपये ४८ लाख ७९ हजार रुपयांच्या खर्चास, महापालिकेचे अद्यावत प्रायमरी डाटा सेंटर नव्याने कार्यान्वित ठेवणेकामी रक्कम रूपये १२ लाख ९५ हजार रुपयांच्या खर्चास, मनपाचे डेटा सेंटर मधील सव्हर, नेटवर्क स्वीचेस, टेप लायग्ररी, फायरवॉल स्टोरेज यांचे अपग्रेड/वॉरंटी देण्यासाठी येणा-या सुमारे ८२ लाख ९८ हजार रुपयांच्या खर्चास, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील मनपा क्षेत्रातील नद्यांची स्वच्छता करणेसाठी आवश्यक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३६ लाख २४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

नव्याने बांधन्यात येणा-या जिजामाता पिंपरी, आकुर्डी, मासुळकर कॉलनी इ.रुग्णालयासाठी इटीएफ येणा-या सुमारे ३ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांच्या खर्चास, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत भोसरी स्पर्धा परीक्षा केंद्राकरीता पुस्तक खरेदीकामी येणा-या सुमारे ४७ हजार रुपयांच्या खर्चास, महापालिकेच्या भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय भोसरी करीता पुस्तक खरेदीकामी येणा-या सुमारे १ लाख २५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

मनपा प्रभाग क्र.११ मधील कुदळवाडी येथील शाळा इमारतीची उर्वरीत कामे करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ६५ लाख ११ हजार रुपयांच्या खर्चास, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील मैलाशुध्दीकरण केंद्र पंपींग स्टेशनमधील स्काडा सिस्टीमचे देखभाल व दुरुस्ती कामे येणा-या सुमारे १ कोटी ७६ लाख ७२ हजार रुपयांच्या खर्चास, मनपाच्या विदयुत विभागाकडील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मनपा इमारती कार्यालय आणि रस्त्यांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणेकामी येणा-या सुमारे ४७ लाख ८८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button